Skip to main content

मसान : जिवन आणि मृत्यू दरम्यान चा प्रवास

"What is life: a delicate balance of the five elements,
What is death: a slight disturbance of this equilibrium."



सगळ्यात अगोदर मसान हा सिनेमा नसुन एक प्रवास आहे. जात, संस्कृती, रिती रिवाज, जीवन, मृत्यू, आशा आणि वेदना यांच्या संबंधीत गुंतागुंत आणि सत्य शोधणार्या निरागस हृदयांचा प्रवास.

मसान चा अर्थ स्मशान असा होतो. देवी (Richa chadda) आणि दिपक (Vicky Kaushal) यांच्या स्वप्नांना जाळणारं ठिकाण. मसान या जळणार्या स्वप्नांच्या मागच्या भेसुर वेदने बद्दल भाष्य करतो. कुठलाही शोक न करता, न रडता, न ओरडता शरीरातला आत्मा काढुन त्याला जाळण्याचा प्रकार म्हणजेच मसान.

हा एक शांत प्रवास आहे. ढिगभर स्वप्नांच्या आणि अपेक्षांच्या मागे लागुन देवी आणि दिपक जीवनाचा खरा अर्थ शोधतात. शेवटच्या दृष्यात ते दोघे ही एकाच नावेतुन प्रवास करतात. भोगलेल्या दु:खांना आणि वेदनेला विसरून एकमेकांशी अशा प्रकारे बोलतात जणु आपल्या जिवंत असण्याचा ते पुरावाच देतात. आपण वेदना, विरह आणि मृत्यू यांना सामोरे जातो. खुप वेळा जिवनात विरह येतो पण त्याने आपलं जीवन थांबत नाही, कारण त्याच वेळी जिवनाला एक नवीन बदल अपेक्षित असतो.

देवी पाठक :


प्रियकराचा मृत्यू, पोलिस अधिकाऱ्याची बापाकडे पैशांची मागणी, समाजात होणारी बदनामी या सगळ्यांना सामोरं जाऊन देवी खंबीरपणे उभी राहते. स्त्रीयांना घाटावर जाण्यास परवानगी नसल्याने प्रियकराचा अंत्यविधी पाहण्यासाठी ती जवळच्याच एका इमारतीच्या छतावर जाऊन उभी राहते. त्यावेळी तिच्या आजूबाजूला सगळीकडे धुकं पसरलेलं दाखवलंय. त्याच्या पलिकडे एक सुंदर जग आहे, पण आपल्या सोबत काही घटना एवढ्या वाईट घडतात की आपल्या मनावर नैराश्याचं धुकं पसरवतात. आणि भविष्य आपल्याला अंधुक दिसायला लागतं. कुणीतरी गेलं म्हणुन रडत बसण्यापेक्षा मनावरचं नैराश्याचं धुकं बाजुला सारुन उज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देवी पाठक या समाजाला देऊन जाते.

दिपक :



पिढ्यानपिढ्या स्मशानात मुडदे जाळण्याच्या कामाचा वीट आलेला दिपक Civil engineering करताना 'शालु' या उच्च जातीय मुलीच्या प्रेमात पडतो. आणि अपघाताने शालुचा मृत्यू होतो. 
एका दृश्यात दिपक पाण्यामध्ये अंगठी फेकतो आणि लगेच तीला शोधण्यासाठी नदीत उडीही मारतो. इथे मसान हे सांगण्याचा प्रयत्न करतो की माणुस खरंच किती आशावादी असतो. गेलेला व्यक्ती परत येणार नाही हे माहीत असूनही त्याच्या आठवणींच्या मागे धावण्याचा प्रयत्न माणुस सदैव करत राहतो. शालु कायमची गेली आहे, नदीत फेकलेल्या अंगठी प्रमाणे ती परत नाही येणार हे माहीत असूनही अंगठी शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न दिपक करत राहतो. कुणीतरी कधीच परत येणार नाही हे सत्य पचवणं खरंच खुप अवघड असतं, पण जर हेच आपल्या नशिबात असेल तर?

_____________________________________________

मैं हुं पाणी के बुलबुले जैसा, तुझे सोंचुतो फुंट जाता हुं।
तु किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता हुं।



Ashok kadam.......









Comments

Popular posts from this blog

Sir Isaac Newton

Millions saw the Apple fall, but Newton was the one who asked, why?

B.P.T.

Basic proportionality theoram (B.P.T.)

तमाशा

ज्यांना तमाशा मुव्ही समजला नाही त्यांच्यासाठी...  आणि ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी.... फ़िर क्या हुआ होना क्या है... वही कहानी फ़िर एक बार... मजनू ने लिये कपडे फाड... मार तमाशा बीच बाजार.... रुक्के सोचा ऐसा क्यू? ऐसा वैसा जैसा तैसा... पैसा... पैसा... पैसा ना होता तो कैसा होता... सोचो! अरे छोडो बोरिंग बाते सारी... मस्त रहो, जम के खाओ... ले लो पंगे, छडलो सुली... फाड लो कपडे, तोड दो बंधन... खोलदो रस्सी... बोलदो किस्सा... सभी जनो का दिल बेह लाओ शोर माचाओ.. मारो ठुमका... फेक् बिखेरो, मन कि चांदी... दिल का सोना आंख का मोती सब अर्पित है, आपकी खातीर मै नौकर हूं आपका मालिक टाई पेहेन के लिफ्ट में चढ़कर फ़िर आ उंगा... आपके आंगान वही करुंगा... जो रोज किया है वो फिरसे करुंगा फिरसे करुंगा फिरसे करुंगा.. अच्चा बेटा कभी इधर तो कभी उधर... अंदर क्या है... अंदर क्या है... तारा... तारा.... कोनसा तारा? किस मंजिल का? क्या चक्कर है? कहा चला है दिल का रस्ता... बिन कदमो के! दूर खडी है सपनो कि मलीका... होती रेत है.. लगता पानी... उसके लिये में पापड ...